“मोदी आमच्यामागे पहाडासारखे उभे आहेत, म्हणूनच आम्ही…”, अटल सेतूच्या उद्घाटनानंतर फडणवीसांकडून कौतुकोद्गार

Mumbai-Navi Mumbai Atal Setu Bridge : बहुप्रतिक्षित असलेला शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचे आज (१२ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उद्घाटनानंतर नवी मुंबई येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सभास्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागतासाठी दुतर्फा गर्दी झाली होती. दरम्यान, या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला सर्वांत जास्त आनंद आहे की अटल सेतूचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं. याचे भूमिपूजनही मोदींनी केलं होतं. या देशात मोदीराज आला म्हणून अटल सेतू पूर्ण होऊ शकला. मोदीराज आला नसता तर अटल सेतू होऊच शकला नाही. अटल सेतूची १९७३ मध्ये संकल्पना मांडली होती. १९८२ मध्ये जेआरडी टाटा कमिटनीने अलाईन्टमेंट केली. परंतु, ४० वर्षांत काहीच झालं नाही. मोदी पंतप्रधान बनले तसा देशाचा मिजास बदलला, काम करण्याची पद्धती बदलल्या आणि मग अनेक गोष्टी वेगाने चालू लागल्या.

Comments (0)
Add Comment