Parner Darshan
The news is by your side.

“राजकारण चोरी करणाऱ्यांसाठी आहे का?”; माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा तरुणांना सवाल

9

राजकारण काय केवळ चोरी करणाऱ्यांचे आहे का, असा सवाल मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उपस्थित केला.

पुणे : स्वतंत्रपणे काम करायला मर्यादा आहेत. राजकारणात आल्याने मोठ्या स्तरावर काम करणे शक्य झाले. राजकारणात यायला घाबरू नका. राजकारण काय केवळ चोरी करणाऱ्यांचे आहे का, असा सवाल मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उपस्थित केला.

एमआयटी विश्वशांती विद्यापीठात आयोजित भारतीय छात्र संसद समारोप कार्यक्रमात चौहान बोलत होते. एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड यावेळी उपस्थित होते.

तरुणांशी संवाद साधताना चौहान म्हणाले, की माझ्या मतदारसंघातून आतापर्यंत मी अकरा वेळा निवडून आलोय. मी माझ्या मतदारसंघात प्रचार करत नाही. राजकारणातील पैशाचा प्रभाव संपवण्यासाठी राजकारणात या. स्वतःला ओळखा. तुम्ही तुम्हाला हवे ते मिळवू शकता. स्वतंत्रपणे काम करायला मर्यादा आहेत. राजकारणात आल्याने मोठ्या स्तरावर काम करणे शक्य झाले. राजकारणात यायला घाबरू नका. राजकारण काय केवळ चोरी करणाऱ्यांचे आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Leave A Reply

Your email address will not be published.