३० वर्षांनी शनीने मूळ त्रिकोण राशीत पूर्ण केलं वर्ष; ‘या’ राशी होणार साडेसाती व ढैया मुक्त, धनलाभाचे प्रबळ योग
Shani Gochar 2024 Zodiac Signs to Benefit: शनीदेव हे ज्योतिषशास्त्रानुसार न्यायदेवता मानली जातात. ना ते कोणाचे मित्र ना ते कोणाचे शत्रू मात्र प्रत्येक राशीच्या व्यक्तीला त्याच्या कर्मानुरूप फळ देण्याचे काम शनीचे असते. २०२३ हे शनीचे वर्ष म्हणून ओळखले गेले होते. जानेवारीच्या सुरुवातीलाच शनीने आपल्या मूळ त्रिकोण राशीत प्रवेश घेतला होता. ३० वर्षांनी कुंभ राशीत विराजमान झालेले शनी आता या गोचराची वर्षपूर्ती करत आहेत. शनीच्या प्रभावाचा एक टप्पा यामुळे पूर्ण होणार आहे तर आता पुढच्या टप्प्यात त्याचा प्रभाव आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. १७ जानेवारी २०२४ ला वर्षपूर्तीनंतर शनीच्या प्रभावाचा द्वितीय टप्पा आरंभणार आहे. वर म्हटल्याप्रमाणे शनीला शुभ अशुभ परिणाम व्यक्तीच्या कर्मानुरूप व त्या राशीच्या गोचर कुंडलीतील स्थानावरून देत असतो. येत्या कालावधीत खालील तीन राशींच्या कक्षेत शनी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. परिणामी या राशींना सर्वतोपरी बदल अनुभवता येणार आहेत. शनीच्या कृपेने धन- आरोग्य व प्रगती अनुभवू शकतील अशा या तीन राशी कोणत्या पाहूया..
शनी गोचराची वर्षपूर्ती; २०२४ मध्ये ‘या’ राशींना धनलाभाचे प्रबळ योग
कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)
शनी महाराजांचे कुंभ राशीतील स्थान कर्क राशीच्या करिअर व कामाच्या ठिकाणी अत्यंत प्रभावशाली ठरू शकते. या मंडळींना नव्या नोकरीच्या संधी चालून येऊ शकतात. आपल्यावरील शनीच्या अडीच वर्षांच्या ढैया प्रभावाची समाप्ती होत आहे त्यामुळे मानसिक ताण तणाव दूर होऊ शकतो. अत्यंत समजूतदारीने गोड बोलून काम करून घ्यावे लागू शकते पण तुम्ही स्वतःच्या हिताला प्राधान्य द्यायला हवे. विवाहित महिलांसाठी तर हा कालावधी खूपच लाभदायक सिद्ध होऊ शकतो. सासरच्या घरी अचानक मोठ्या धनलाभाचे संकेत आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनशैलीत काही महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतात.